केत्तुर आणि खातगाव बनला वाळु माफियांचा गड ; वाळु माफिया झाले बादशाह
करमाळा समाचार
उजनी जलाशयातून खुलेआम वाळू उपसा केला जात असून दिवसाढवळ्या याची वाहतूक केली जात आहे. तरीही याची कोणत्याही यंत्रणेकडून दखल घेतली जात नसल्याने परिसरातील वाळूमाफिया त्या भागातील बादशहा असल्यासारखे वागत आहेत. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यातील केतुर क्रमांक दोन व खातगाव क्रमांक दोन या ठिकाणाहून वाळू माफिया चा धुमाकूळ सुरू आहे. यामध्ये वाळू माफिया व गुंड प्रवृत्तीचे लोक उजनी जलाशयातून हजारो ब्रास वाळू काढतात व स्थानिकांनी काही बोलण्यास दमदाटी करतात गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. यावर आळा घालावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. विरोध करणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आतापर्यंत दिल्या गेल्या आहेत.
यासंदर्भात केतुर येथील राजेंद्र रामचंद्र खटके यांनी ग्रामसेवकांकडे व जिल्हाधिकारी यांना तक्रार दिलेली आहे. सदरची गुंडगिरी व वाळू उपसा बंद झाला नाही तर केतुर ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.