कोर्टी, वीट नंतर आणखी एका ठिकाणी कुंटणखान्यावर छापा ; 6 महिलांसह 15 ताब्यात
तालुक्यातील जिंती परिसरात करमाळा पोलिसांनी सोलापूर जिल्हा पोलिसांच्या सह संयुक्त कामगिरी करत एका लॉज वर छापा टाकला. या ठिकाणाहून सहा महिलांसह 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या ठिकाणी कुंटनखाना सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून मिळाली होती. त्यानंतर मध्यरात्री सदरचा छापा टाकण्यात आला.
यावेळी पोलिस निरिक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरिक्षक रोहित उबाळे, हवालदार अजित उबाळे, सोमनाथ जगताप, गणेश शिंदे, समीर खैरे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील पथकात टेंभुर्णीचे पोलिस निरिक्षक पाटील व इतर पोलिस कर्मचारी यांनी हा छापा टाकला आहे. करमाळा व सोलापूर पोलिसांकडुन सयुक्त कारवाई करण्यात आली.

जिंती तालुका करमाळा येथील अमोल लॉजवर महाराष्ट्रातील तसेच परप्रांतीय महिलांच्या माध्यमातून कुंटनखाना चालवला जात असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर मध्यरात्री त्या ठिकाणी पोलीस पोहचले. यावेळी सहा महिला व नऊ जण मिळून आले आहेत. त्यामध्ये चालक, कर्मचारी व ग्राहकाचा समावेश असल्याची माहीती आहे. करमाळा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी वीट व कोर्टी येथील कुंटनखान्यावरती छापा टाकल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने अकरा महिलांची सुधारग्रहात रवानगी करण्यात आली होती.