करमाळा शहर व तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा मोठया प्रमाणात पुरवठा करावा-पुजा झोळे
करमाळा समाचार – संजय साखरे
करमाळा शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे.तालुक्यात आठवड्याला फारच कमी प्रमाणात लस उपलब्ध होते तर त्यातील करमाळा शहरात फक्त २०० तर कधी ३०० लसींचा पुरवठा होत आहे. लसीकरणाचा वेग जर असाच राहिला तर कोरोनाचे संकट अधिक प्रमाणात वाढू शकते,म्हणून आठवड्याला करमाळा शहरासाठी किमान १००० लसींचा साठा उपलब्ध करून दयावा व लवकरात लवकर 18 ते 44 वयोगटातील सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सूचना दयाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पुजा झोळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या कडे केली.

तसेच सर्वांत आधी फ्रंटलाइन वर्कर म्हणून आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांचे लसीकरण करण्यात यावे.त्यामधे खाजगी दुकानदारांचा त्यात प्रामुख्याने मेडिकल दुकानदार,पेट्रोल पंप कर्मचारी,कृषी दुकाने,गॅस एजन्सी, रेशन दुकानदार , किराणा दुकानदार,हमाल कामगार इ. समावेश करण्यात यावा जेणे करून लॉकडाऊन नियम शिथील झाल्यानंतर नागरीकांना सेवा देणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देऊन त्यांना कोरोना संसर्गापासून दूर ठेवता येणे शक्य होईल.अशा विविध मागण्या पुजा झोळे यांनी पालकमंत्री महोदयाकडे केल्या आहेत.
