तालुक्याच्या पुर्व भागात बिबट्याचे पुन्हा दर्शन ; सतर्क राहण्याचे आवाहन
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या प्रवेशाने तालुका हादरून गेला आहे. तर सायंकाळच्या सुमारास बोरगाव परिसरात एकास बिबट्या दिसला असून नदीच्या कडेने गेला असल्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. त्यानंतर वन विभागाला कळवले असून वनविभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. संबंधित व्यक्तीने त्या ठिकाणी जाऊन पावलाचे ठसे तपासावे असे काही सूचना दिल्या आहेत.

मागील वेळी ही अशाच पद्धतीने कोरोनामुळे लॉकडाऊन झाले होते. लॉकडाऊन उठल्यानंतर बिबट्याचे दहशतीने जवळपास तीन महिने करमाळा तालुका हादरून गेला होता. परंतु तो नरभक्षक बिबट्या होता. आता आलेला बिबट्याचा आहे का याबाबत संशय जरी असला तरी आता नुकताच लॉकडाऊन संपत आला आहे व पुन्हा बिबट्याच्या दहशतीने परिसर दणाणून गेला आहे.

अनेक दिवसांपासून बिबट्या हा उजनी परिसरात असल्याबाबत चर्चा आजही आहेत. त्या परिसरातील रानडुक्कर असो किंवा पाळीव प्राणी यावर त्याचे हल्ले झालेले आपण सर्रास ऐकून आहोत. परंतु पुर्वभागात बोरगाव, संगोबा, तरडगाव , पोटेगाव या भागात आज पर्यंत बिबट्या असल्या बाबत चर्चा ऐकून नव्हते. पहिल्यांदाच त्या परिसरात बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण आहे. सध्या तरी प्रत्येकाने आपल्या आपल्या जनावराची व लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. बाहेर झोपत असणाऱ्यांनी बाहेर झोपू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय रात्री-अपरात्री शेतीकडे रात्री एकट्याने जाऊ नये.