महिला स्वयंसहायता समूहांना २ कोटी १६ लाख रुपये कर्ज वाटप
प्रतिनिधी – संजय साखरे
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती करमाळा अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहामार्फत तयार केलेल्या खाद्यपदार्थ, साबण, उटणे, ब्रोच, लिपस्टिक, लिपबाम, पणत्या, आकाश कंदिल, केरसुणी, हँडवाँश आदी विविध वस्तूंचे तालुक्यातील महिला बचत गटाच्या उत्पादनाचे प्रदर्शन रुक्मिणी दिवाळी महोत्सवाअंतर्गत नगरपरिषद, करमाळा आवारात दि.२१/१०/२२ आयोजित केलेले होते.

ग्रामीण भागातील महिला अनेक प्रकारचा दिवाळी फराळ व हस्तकलेतून वस्तूंची निर्मिती करतात. महिलांना बाजारात कोणत्या प्रकारचे उत्पादनास जास्त मागणी असते, मार्केटिंग कौशल्य अवगत होणे या माध्यामतून महिलांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावून उपजीविकेच्या साधनामध्ये वाढ करणे हा या प्रदर्शानामागचा उद्देश आहे. या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. संजय मामा शिंदे विधानसभा सदस्य करमाळा माढा यांचे हस्ते करण्यात आले यावेळी उद्धव माळी माजी जि. प. सदस्य, श्री. समीर माने तहसीलदार, श्री. मनोज राऊत गटविकास अधिकारी, श्री. बालाजी लोंढे मुख्याधिकारी, श्री. योगेश जगताप तालुका अभियान व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती करमाळा व BOM, IDBI, UBI, SBI, BOI, VKGB शाखा करमाळा HDFC शाखा टेंभूर्णी यांचे संयुक्त विद्यमाने बँक कर्ज मेळावा झाला यात एकूण ७२ स्वयंसहायता समूहांना १ कोटी ५३ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले व अभियानामार्फत दिला जाणारा समुदाय गुंतवणूक निधी ६३ लाख रुपये जि.प. गट कोर्टी अंतर्गत गावातील ग्रामसंघावाटप करण्यात आला. यावेळी संजयमामा शिंदे यांनी यापूर्वी बचत गटामध्ये कर्ज परतफेड वेळेवर होत नसलेने बँकेकडून कर्ज वाटपाचे प्रमाण कमी होते पण उमेदच्या बचत गटांमुळे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होत आहे. महिलांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड होत असल्याने बँकाही मोठ्या प्रमाणात उमेद अभियानाअंतर्गत कर्जाचे वितरण करत आहेत यापुढेही बँकाने सामाजिक दायित्व दाखवून महिला स्वयंसहायता समूहांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करावे. श्रीमंतासारखी सेवा गरीब महिलांनाही देण्याचे आवाहन करून बचत गटांनी कर्जाची वेळेत परतफेड करावी. बचत गटांनी नाविन्यपूर्ण कामाने इतरांपेक्षा वेगळे पदार्थ तयार करून ऑनलाईन पद्धतीने मार्केटिंग करावे.

गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत यांनी मिळालेल्या कर्ज रकमेतून समूहांनी लहान मोठे लघुउद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. सन २०२२-२३ हे आर्थिक वर्ष उपजीविका वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यामुळे या कालावधीत जास्तीत जास्त उद्योगांची उभारणी करावी. यासाठी कृषी विभागामार्फत सुरु असलेल्या PMFME योजनेचा लाभ घेऊन उद्योग उभारणी करावी. त्याचबरोबर कर्ज वेळेवर परतफेड करून सुमतीताई सुकळीकर व्याज अनुदानाचा लाभ सर्व समूहांनी घ्यावा. बँकेने दिलेले कर्ज स्वयंसहायता समूह वेळेवर परतफेड करत आहेत व लहान उद्योगाची उभारणी होत असलेने समूहाचे हप्ते व व्याज वेळेवर जमा होत आहे त्यामुळे यापुढेही असाच नियमितपणा राहिल्यास बँकेकडून यापुढील कर्ज अजून मोठ्या प्रमाणात वाटप केले जाईल.
यावेळी श्री. उद्धव माळी माजी जि.प. सदस्य, श्री. बालाजी लोंढे मुख्याधिकारी करमाळा, श्री. संतोष डोंबे जिल्हा व्यवस्थापक उपजीविका, श्री. भगवान कोरे जिल्हा व्यवस्थापक आर्थिक समावेशन, अशपाक जमादार, सुरज ढेरे, श्री. हनुमंत भालेराव FLC BOI, शिंदे क्रिशल फौंडेशन, श्रीकांत धेंडे कृषी अधिकारी UBI, करमाळा, अविनाश पिटे शाखा व्यवस्थापक BOM, HDFC प्रवीण शिंदे, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत मस्तूद तालुका व्यवस्थापक आर्थिक सामावेशन, पोपट माने, शिवराज खालीपे प्रभाग समन्वयक, दादासाहेब शिंदे, शंकर येवले, महावीर नरसाळे, सागर पोरे, हनुमंत पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन पोपट माने यांनी केले.