E-Paper

वीज बील माफ करावे म्हणुन जामखेड येथे महावितरण कार्यालयाला कुलुप

जामखेड प्रतिनिधी

सरकार सावकारसारखे वागत आहे. जनतेला, ग्राहकांना दिलेले अश्वासन राज्य सरकार पाळत नसल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने जामखेड विज वितरण कार्यालयाला दि १० रोजी टाळे ठोक अंदोलन करण्यात आले.

राज्यातील नागरिकांचे कोविड दरम्यानच्या काळात चार महिन्यांचे २०० युनिट पर्यंत विज बिल माफी व वीज दर वाढ मागे घेवून ३०% दर कपातीचे आश्वासन पूर्ण करण्याचे निर्णय घेण्यात यावेत अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यातील सर्व वीज कार्यालयांना दि.१० सप्टें रोजी कुलूप लावण्याचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याअनुषंगाने जामखेड तालुका आम आदमी पार्टीने जामखेड विज कार्यालयाला कुलूप लावले.

यावेळी ऊपाध्यक्ष संतोष नवलाखा, जामखेड संयोजक बजरंग सरडे, सुंदर परदेशी, अजय भोसले,गणेश गवसणे,स्वानंद कुलकर्णी, नंदु गंगावणे, सुनिल कांबळे, बापु कुलकर्णी, महेश बोरकर, अँड बिपीन वारे, वसीम खान, जिलानी शेख, समीर पठाण, कदिर पठाण, बाळु बळे, कांतीलाल कवादे, बाळु सुर्वे, काका रायकर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE