मेजर अक्रुर शिंदे यांना अँन्टी करप्शन बोर्ड दिल्लीचा महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार
करमाळा समाचार
अँन्टी करप्शन बोर्ड भारत सरकार, नवी दिल्लीचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच सिन्नर , जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते . आणि या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या सन्मान सोहळ्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. करमाळा तालुका आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष, व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष,श्री अक्रूर शंकरराव शिंदे यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील विविध सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मेजर अक्रूर शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
