मकाई निवडणुक – आता पर्यत तालुक्यात 18.89 टक्के मतदान ; सर्वाधिक सालसे 36 टक्के
करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत भिलारवाडी गटात एकूण 18 टक्के, पारेवाडी गटात एकूण 17 टक्के, चिकलठाण गटात 17 टक्के, वांगी गटात 20 टक्के, तर मांगी गटात 21 टक्के असे एकूण तालुक्यात 18.89% मतदान आतापर्यंत नोंदवण्यात आले आहे. तर ज्या कोळगावाने बहिष्कार टाकल्याचा दावा केला होता. त्या गावात मतदारांनी मतदान केल्याने बहिष्काराचा दावा फेल गेला आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यावेळी मतपेट्यांचे पूजन करून पुढील मतप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. तालुक्यातील 41 केंद्रांवर सध्या मतदान सुरू असून त्यासाठी मतदार पोहोचत आहेत. आतापर्यंत भिलारवाडी गटात सावडी येथे सर्वाधिक 30टक्के तर खातगाव येथे केवळ सात टक्के मतदान झाले आहे.
पारेवाडी गटात सर्वाधिक वाशिंबे येथे 28 टक्के मतदान झाले आहे. तर केतुर क्रमांक दोन येथे केवळ आठ टक्के मतदान झाले आहे. चिखलठाण गटात वरकटणे येथे 29 टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. तर सर्वाधिक कमी शेटफळ येथे केवळ पाच टक्के मतदान झाले आहे. सालसे येथे 36 टक्के मतदान सर्वाधिक आहे. तर कंदर येथे 14 टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. तसेच मांगी गटात करमाळ्यातून 26टक्के सर्वाधिक तर सर्वात कमी पंधरा टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
