मकाई निवडणुक – चिन्ह वाटपात विमाना विरोधात कपबशी
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत थोड्या वेळापूर्वी चिन्ह वाटप करण्यात आले आहे. यामध्ये बागल गटाच्या सर्व सदस्यांना कपबशी तर विरोधी गटातील उमेदवारांना विमान हे चिन्ह देण्यात आले आहे. सदरची प्रक्रिया तहसील कार्यालय करमाळा येथे पार पडली.

मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आज माघार घेण्याच्या अंतिम दिवसापर्यत एकुण ३९ पैकी १७ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पाच गट अविरोध झाले आहेत. तर विरोधी गटातील चार उमेदवारांनी पाच जागांवर आव्हान कायम ठेवले आहे. त्यामध्ये सुनिता गिरंजे (महिला व भिलारवाडी) , आप्पासाहेब जाधव, (भिलारवाडी), गणेश चौधरी (पारेवाडी) , सुभाष शिंदे (मांगी) यामुळे निवडणुक लागली आहे. १७ जागांमधील ५ अविरोध तर ९ जागांसाठी पाच विरोधात ९ अशी लढत बघायला मिळणार आहे.

सर्व प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे, सह निवडणुक अधिकारी विजयकुमार जाधव, सहाय्यक निबंधक दिपक तिजोरे यांच्या कडे पार पडले दुपारी तीन वाजेपर्यत प्रमुख विरोधी गटातील बाबुराव अंबोदरे (भिलारवाडी गट) व अमित केकान (वांगी गट) या दोन जणांनी अर्ज माघार घेतल्याने विरोधकांच्या सहा जागांवर वेगवेगळे उमेदवार देण्याचा मनसुबा अपुर्ण राहिला आहे. शिवाय वांगी गट अविरोध झाला आहे. सोमवारी माघार घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर लगेच दि ६ रोजी सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. तर १६ जुन रोजी मतदान आहे तर १८ तारखेला मतमोजणी होणार आहे.
निवडणुक लागलेले गटनिहाय उमेदवार:-
भिलारवाडी – रामचंद्र हाके, अजित झांजुर्णे , सुनिता गिरंजे, आप्पासाहेब जाधव, पारेवाडी : उत्तम पांढरे, रेवन्नाथ निकत, संतोष पाटील, गणेश चौधरी, मांगी- दिनेश भांडवलकर, अमोल यादव, सुभाष शिंदे, महिला राखीव प्रतिनिधी- कोमल करगळ, अश्विनी झोळ, सुनिता गिरंजे
अविरोध गटनिहाय उमेदवार:-
चिखलठाण – सतीश नीळ, दिनकर सरडे, वांगी- सचिन पिसाळ, युवराज रोकडे, उस उत्पादक व बिगर उस उत्पादक, पणन संस्था प्रतिनिधी- नवनाथ बागल , भटक्या जाती जमाती- बापु चोरमले, इतर मागास- अनिल अनारसे, अनुसूचित जाती जमाती: अशिष गायकवाड .