मकाई निवडणुक – छाननी पुर्ण सुनावणीही झाली पण निकाल मात्र २२ मेला
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज छाननीच्या दिवशी अनेकांवर तीन वर्ष ऊस व आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्समध्ये वाढलेली अनामत रक्कम थकीत चे कारण समोर करीत आक्षेप घेण्यात आले आहे. त्यामध्ये रामदास झोळ यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले यांचासह 36 अर्जाचा समावेश आहे. या सर्व आक्षेपांवर आज सुनावणी झाली पण त्याचा निकाल हा राखुन ठेवण्यात आल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांनी सांगितले आहे. सदर निकाल २२ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.

सकाळी अकरा वाजल्यापासून तहसील कार्यालयात छाननीला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून सर्व गटाच्या हरकती ऐकून घेतल्या व त्यावर तीन वाजल्यापासून सुनावणी करण्यात आली. तर त्याकाळात सर्व उमेदवार तिथेच वाट पाहत होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांच्या सुनवण्या पुर्ण झाल्या निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे.
