करमाळासोलापूर जिल्हा

सचिव पदावरुन बाजार समीती राजकारण पुन्हा तापले ; 29 ला होणार बैठक

करमाळा समाचार 

सचिव पदभारा संदर्भात पणन संचालकाकडील अपीलावर २८ जूनला सुनावणी तर जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत २९ जूनला बैठक होणार आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सुनील शिंदे यांनी पणन कायदा व कर्मचारी सेवानियमातील तरतुदीनुसार बाजार समितीचे सेवाजेष्ठ व कर्मचारी विठ्ठल क्षीरसागर यांचेकडे पदभार सोपविला. मात्र सभापती शिवाजी बंडगर यांनी सेवानिवृत्त सचिवांनी आमचा आदेश डावलून चार्ज दिल्याचे पणन संचालकांना सांगीतले .

यावर पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना सदस्यांची सभा बोलावून महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन ) अधिनियम १९६३, नियम १९६७ ,परिपत्रके तसेच कर्मचारी सेवा नियमातील तरतुदी व बाजार समितीची कागदपत्रे तपासून सचिव पदभार हस्तांतरणाबाबत योग्य कार्यवाही करणेबाबत कळविले आहे.

politics

त्यामुळे आता जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत स्वतः जिल्हा उपनिबंधक स्वतः उपस्थित राहणार असल्याने संचालक मंडळांना मात्र सचिव पदाचा पदभार देताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन करता येणार नाही.

तर पाटणे हे अपात्र आहेत व बाजार समितीच्या एकूण १० पैकी ९ कर्मचारी हे सेवाजेष्ठतेनुसारच क्षीरसागर यांचीच नेमणूक व्हावी अन्यथा आम्ही हा अन्याय सहन करणार नसलेचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश ढाणे यांनी सांगीतले.

त्यामुळे २८ जून रोजी पणन संचालकापुढे होणारी अपीलाची सुनावणी व २९ जून बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या रोजी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE