वाशिंबेत विवाहीतेची आत्महत्या ; सासु सासऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
वाशिंबे येथील विवाहीतेने सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली आहे. सदर विवाहीतेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सासु सासऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना दि १७ रोजी सायंकाळी ६:४५ वा. सुमारास मौजे वाशिंबे ता. करमाळा येथे घडले आहे. याप्रकरणी विठ्ठल श्रीरंग घाडगे वय-५५ रा. झरे यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी सासरे पंढरीनाथ झोळ रा वाशिंबे ता करमाळा, सासु कौसाबाई झोळ रा वाशिंबे ता करमाळा, पती प्रकाश झोळ रा वाशिंबे ता करमाळा, नणंद मोहिनी संजय खेडकर रा. पेढगाव ता. श्रीगोंदा जि अहमदनगर, प्रमिला निलेश जाधव रा जिंती ता. करमाळा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी प्रकाश झोळ वय २६ वर्ष रा वाशिंबे ता करमाळा असे मयत विवाहितेचे नाव आहे.

सन २०१९ मध्ये कल्याणी चे लग्न प्रकाश झोळ यांच्यासोबत झाले होते. घाडगे यांची मुलगी कल्याणी हिला तिचे सासरे पंढरीनाथ झोळ, सासु कौसाबाई झोळ, पती प्रकाश झोळ, नणंद मोहिनी संजय खेडकर, प्रमिला निलेश जाधव यांनी आपापसात संगनमत करुन मुलीला माहेरुन एक लाख रुपये घेवुन येण्याचे कारणावरुन व घरातील किरकोळ कारणावरुन मानसिक व शारिरिक त्रास देवुन तीला आत्महत्येस प्रवृत केले आहे म्हणुन सासऱ्यासह इतर पाच लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.