मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रतिनिधी – करमाळा समाचार
पारेवाडी तालुका करमाळा येथील अजिंक्य गणेश उत्सव मित्र मंडळाच्या वतीने ने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बाल व्याख्याते चि. प्रतीक लिंगेश्वर नवले याचे श्री छत्रपती शिवाजी महाराज-एक युगपुरुष या विषयावर व्याख्यान झाले.तर इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये केत्तुर येथील श्री नेताजी सुभाष चंद्र विद्यालयात व केत्तुर बोर्डात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कुमारी प्रगती नानासाहेब घाडगे हिचा सत्कार दत्तकला शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक सौ.अर्चना शिंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच बाल व्याख्याते प्रतीक नवले याचा सत्कार धनंजय मोहिते गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सोशल अंतर चा वापर करण्यात आला. यावेळी अजिंक्य मित्र मंडळ चे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मोरे यांनी केले तर आभार बंडू नवले यांनी मानले.
