करमाळासोलापूर जिल्हा

लस न देता आला लसीकरण केल्याचा मेसेज ; ग्रामपंचायत सदस्याला माघारी जाण्याची वेळ

करमाळा समाचार 


कुंभेज येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये 100 लसीचे कॅम्प घेण्यात आला होता. या कॅम्पमध्ये टोकन पद्धतीने व ऑनलाइन पद्धतीने ज्यांनी नाव नोंदणी केली असेल अशाच व्यक्तींना लसीकरण देण्याचे ठरले होते. टोकण पद्धतीने ज्या लोकांचे व्हेरिफिकेशन करण्यात आले होते अशांना लसीकरण दिले गेले नाही. स्वतः ग्रामपंचायत  सदस्य असून त्यांच्यासोबत असा प्रकार घडला असून त्यांच्यासोबत 15 ते 20 लोकांची ही अशीच समस्या आहे.

ज्या लोकांना लसिकरण देण्यात आले पाहिजे होते त्यांना करण्यात आले नाही आणि त्या लोकांना ऑनलाइन व्हॅक्सिनेटेड करण्यात आले आहे. संबंधित लोकांना देण्यात येणाऱ्या लस कुठे गेल्या असा आरोप ग्रामपंचायत सदस्य रणजीत कादगे यांनी केला आहे.

त्यांनी लसीकरण कोणत्या नियमानुसार केलेले आहे याची चौकशी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी, तहसीलदार ,गट विकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी करमाळा यांना तक्रारी अर्ज दिलेला असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य रणजित कादगे यांनी केली आहे .

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE