करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मोक्का आणि दरोड्याच्या आरोपीला करमाळा पोलिसांकडुन बेड्या ; पाच वर्ष होता फरार

करमाळा समाचार

दरोडा आणि मोक्कातील फरार आरोपीस अटक
तालुक्यात विविध ठिकाणी दरोडा आणि मोका मधील आरोपीस करमाळा पोलिसांना पकडण्यात यश आले आहे शनिवार दि नव रोजी शेलगाव येथे ही कारवाई करण्यात आली सदरची कारवाई ही करमाळा पोलीस व गुन्हा प्रकटीकरण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे संबंधित आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तकदीऱ्या आत्मऱ्या भोसले रा. शेलगाव वांगी, तालुका करमाळा

दरोडा अणि जबरी चोरीच्या अनेक गुन्ह्यामध्ये पाच वर्षापासून फरार असलेल्या आरोपी त्याचे राहते घरी शेलगाव येथे येणार असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सापळा रचला होता. आरोपीस पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी शिताफीने पाठलाग आरोपी तकदीर आत्माराम भोसले यास ताब्यात घेतले आहे. त्याने बऱ्याच गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस निरिक्षक जोतिराम गुंजवटे, पोह. अजित उबाळे, पोना. चंद्रकांत ढवळे, पोशि. तौफिक काझी, अमोल जगताप, गणेश शिंदे , सोमनाथ जगताप यांनी केली आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE