आई आमच्या लेकरांना त्रास होतोय … सरकारला सुबुद्धी दे – जरांगेंचे देवीला साकडे
करमाळा समाचार –
सभेला जरी उशीर झाला तरी नेत्यांसारखे आपण जाण्याचे टाळत नाही. समाज बांधवांनी येवढ्या थडीत शेकोटी पेटवत उपस्थिती दाखवली यांची नोंद महाराष्ट्र घेईल. सरकारकडुन आरक्षण मिळणारच आहे पण त्यातही काय कमीजास्त झाले तरी माझ्या जीवात जीव आहे तो पर्यत एक इंचही मागे हाटणार नाही आरक्षण मिळऊनच राहणार असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना दिले. तर १ डिसेंबर पासुन पुन्हा एकदा साखळी आंदोलन सुरु करा अशा सुचनाही यावेळी दिल्या तर “आई आमच्या लेकरांना त्रास होतोय..” म्हणत कमलाभवानी देवीकडे साकडे घातले आहे.

मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सभांचा तिसरा टप्पा दि १५ पासुन सुरु झाला आहे. यामध्ये पहिली सभा उस्मानाबाद जिल्ह्यात होती तर तिसरी सभा करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथे बुधवारी सायंकाळी सात वाजता होणार होती पण गावोगावी भेटीगाठी व सभा मुळे मनोज जरांगे पाटलांना करमाळ्यात येताना तब्बल ९ तास उशीर झाल्याने सदरची सभा पहाटे चारच्या सुमारास पार पडली. सुरुवातीला महिला व पुरषांसह हजारो बांधव उपस्थित होते पण उजनीच्या कडेला थंडीमुळे उपस्थितीती कमी होत गेली व पहाटेवेळी उपस्थित जनसमुदाय कमी प्रमाणात असतानाही त्यांच्यासाठी जरांगे यांनी सदर ठिकाणी भेट दिली व संबोधीत केले.

उजनी जलाशयाच्या परिसरामध्ये भीमा नदीच्या कोरड्या पात्रात सदर ठिकाणी १७१ एकर मध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या ठिकाणी दुपारपासुनच लोकांनी गर्दी केली होती पण रात्री उशीरा पर्यत जरांगे न आल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. त्यादरम्यान वांगी व परिसरातील युवती व महिलांच्या भाषणाने समाज बांधवांना बांधुन ठेवले तर लोकशाहीर राजेंद्र कांबळे यांच्या शाहीरीने अंगावर शहारे आणले. उर्वरीत समाज बांधवांनी सभेच्या ठिकाणी शेकोटी पेटवत थंडीत उपस्थती दर्शवली. सभा संपल्यानंतर जेऊर परिसरात मुक्काम केला तर गुरुवारी सकाळी दहा वाजता करमाळा शहरात छत्रपती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळाल्या अभिवादन करुन कमला भवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर करमाळा येथील डायलिसिस सेन्टर व ब्लॅड बॅंक ला भेट दिली.
आई आमच्या लेकरांना त्रास होतोय ..
करमाळा तालुक्यात कमला भवानी मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर गावातील डायलिसिस सेंटर या ठिकाणी भेट दिली यावेळी बोलताना जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण मिळणारच असे जाहीर करताना आईकडे साकडे घातलेय की, आई आमच्या लेकरांना त्रास होतोय , आमच्यावर जो अन्याय होतोय तो दूर करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी दे मराठा बांधवांनी जी साथ दिली ती अशीच राहू द्या तर मराठा समाजाचेच काही सरकारला जाऊन मिळु शकतात त्यामुळे कोणवर विश्वास ठेऊ नका सावध रहा असेही म्हणाले.