वांगी येथील सौ. नीता सोमनाथ खराडे यांची राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड
करमाळा समाचार
पुणे म्हणजे चळवळीचे केंद्र आणि नेतृत्वाची खाण च जणू…याच पुणे शहराने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात टिळक, आगरकर, गोखले यांच्या सारखी महारत्ने घडवली व यांनीच पुढे स्वातंत्र्य चळवळीत देशाचे नेतृत्व केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले असोत किंवा महर्षि कर्वे यांनी देखील पुण्याची ओळख देशाला विद्येचे माहेरघर म्हणून करून दिली. अगदी आज देखील महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे राजकारण ज्या एकाच व्यक्तीभोवती कायम फिरत असते ते म्हणजे शरद पवार यांचे देखील नेतृत्व याच पुण्यामधून घडले…अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर पुणे तिथे काय उणे अशा या पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती सेलच्या उपाध्यक्ष पदाची धूरा आज पक्ष नेतृत्वाने वांगीच्या नीता (ताई) सोमनाथ खराडे यांच्याकडे दिली आहे.

विशेष म्हणजे त्यांचे पती सोमनाथ खराडे हे गेल्या २ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तसेच नीताताई यांनीही याआधी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस या पदावर काम केलेले आहे. कोणत्याही स्वरुपाची राजकीय पार्श्वभूमी नसताना वांगीच्या मातीतून खराडे दांपत्याने स्वतःच्या कर्तृत्वाने सामाजिक कामांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. राजकीय पटलावर दोघेही पती-पत्नी हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. वास्तविक पाहता पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पद मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या ही नक्कीच जास्त असते. एवढ्या सगळ्या इच्छुकांच्या स्पर्धेतून नीताताईंना उपाध्यक्ष पद मिळाले…ही आमच्या सर्वांसाठी एक भूषणावह आणि आनंदाची बाब आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यात सत्तेत असताना आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना पक्ष नेतृत्वाने नीताताईंवर जो विश्वास दाखवला आहे…त्या विश्वासाला निश्चितच साजेसे काम नीताताई करतील याबद्दल आमच्या मनात यत्किंचितही शंका नाही. त्यांच्या निवडीची बातमी वांगीत समजली आणि सर्वच गट व पक्षाच्या प्रतिनिधींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. पुढील वाटचालीस आमच्या सर्वांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा…!
*श्री. सोमनाथ बाळासाहेब खराडे*
(प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल)