माझ्या देहाच्या चांगल्या कामासाठी वापर म्हणत श्रीमती मेहेर यांचा देहदान संकल्प
जामखेड | प्रतिनिधी
तालुका जामखेड येथील श्रीमती शोभा किशोर मेहेर वय ५६ यांनी आपल्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला असुन त्या संदर्भातील सविस्तर माहीतीचा फॉर्म जैन कॉन्फरन्स दिल्लीचे सदस्य संजय कोठारी यांच्या कडे सुपुर्त केला आहे.
जैन कॉन्फरन्स दिल्ली चतुर्थ झोन मार्फत सर्वत्र मरणोत्तर देहदान करण्यासंदर्भात प्रबोधन करुन मरणोत्तर देहदानासाठी मोठया प्रमाणात जागृती केली जात आहे. कारण आपल्या मृत्युनंतर आपल्या देहास अग्नी देणे अथवा दफन करण्यापेक्षा त्या शरीरातील अवयवाचा उपयोग इतर गरजु रुग्ण व्यक्तीस व्हावा या उद्देशाने आपल्या मृत्युनंतर देहदान केले तर अनेक वैदकीय सेवेतील शिकाऊ डॉक्टरांना मानवी शरीरातील प्रत्येक अवयव व आंतर स्थिती चा परिपूर्ण अभ्यास करता येतो
त्यामुळे मरणोत्तर देहदानाचे अनेक फायदे असतात तसेच ते एक पुण्य कर्म असल्याने अनेक ज्ञानी लोक आपला मरणोत्तर देह दान करण्याचा संकल्प करून तसा सवीस्तर माहीतीचा फॉर्म मृत्युपुर्वीच विविध संस्थाच्या माध्यमातुन दाखल करून देतात. याच पार्श्वभूमीवर जामखेड येथील श्रीमती शोभा मेहेर यांनी आपला मरणोत्तर देहदानासाठी जैन फॉन्फरन्स दिल्ली चतुर्थ झोन राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याकडे जामखेड येथे भरला आहे.
यावेळी संजय कोठारी यांनी त्यांचा यथोचीत सत्कार केला यावेळी सौ शांताबाई कोठारी, सौ सरला कोठारी,सौ श्वेता कोठारी यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरून घेतला व त्याच बरोबर इतर समाजातील सर्वाना देहदान जरूर करावे असे सांगीतले
यावेळी बोलताना श्रीमती शोभा मेहेर म्हणाल्या माझ्या देहा मुळे जर १२डॉक्टर शिकत असतील आणी ते हजारो लोकांचे प्राण वाचत असतील तर मला त्यामध्ये समाधान आहे.
हा देह नाशवंत आहे. आज मला फॉर्म भरताना फार भरून आले की माझा देह चांगल्या कामासाठी कामाला येत आहे यासाठी मी कोठारी प्रतिष्ठान आणि जैन कॉन्फरन्सचे आभारी आहे.