नगरपरिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा नंबर 4 करमाळा या शाळेत मोफत गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न
करमाळा समाचार
करमाळा शहरातील नगरपरिषद प्राथमिक मुला मुलींची शाळा नंबर 4 या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी मोफत गणवेश वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दादासाहेब इंदलकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ञ व साहित्यिका सौ अंजली श्रीवास्तव मॅडम ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रस्तावित शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चंद्रकला सतीश तांगडे यांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये थोर नेत्यांची कार्य व देशासाठी बलिदान करणाऱ्या देशभक्तांच्या गोष्टी सांगण्यात आल्या. साहित्यिका सौ अंजली श्रीवास्तव मॅडम यांनी बाल देशभक्त शिरीष कुमारची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले व मुलांमध्ये लहानपणापासून देशभक्ती व राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी विविध प्रसंग सांगितले शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सौ वंदना शिंगटे मॅडम व पालक सौ बोकन मॅडम यांनी शाळेविषयी समाधान व्यक्त केले.

गणवेश वाटपाचा कार्यक्रम श्री दादासाहेब इंदलकर व शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व मुलांना मोफत गणवेश वाटप केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष माने सरांनी केले. तर आभार श्रीमती आसराबाई भोसले मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक श्री बाळू सर व श्री मुकुंद मुसळे सर यांनी परिश्रम घेतले.