क्षुल्लक कारणातुन खुन ; संबंधित आरोपींना अटक एक फरार
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे नळाचे पाणी दारात का आले या क्षुल्लक कारणातुन झालेल्या मारहाणीत एकाला जीव गमवावा लागला होता. त्या प्रकरणात विधी संघर्ष बालकासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी तर विधी संघर्ष बालकाला सोलापूर येथे विधी संघर्ष कोठडीत नेण्यात आले होते. संबंधित दोघांना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत सुनावली तर यातील एक आरोपी फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदरची घटना १७ जुलै रोजी कोर्टी येथे घडली होती.

याप्रकरणी अटकेत असलेल्या सुनिता केंदळे व रतन केंदळे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की केंदळे व भोसले हे दोन्ही कुटुंब कोर्टी तालुका करमाळा येथील खंडोबा झोपडपट्टी येथे राहत आहेत. दि १७ रोजी रोजी सकाळी नऊ वाजता शितल भोसले या दूध आणण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी सुनिता केंदळे यांच्या घरासमोरून जात असताना ‘तुझ्या घराच्या नळाचे पाणी आमच्या घराच्या समोर कसे आले ‘ असे म्हणत यावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला.
याचे रूपांतर मारहाणीत सुरू झाले. त्यानंतर त्या ठिकाणी सुनिता व तिचे कुटुंबीय आले तर भांडण सोडवण्यासाठी शितल हिचा नवरा गणेश त्या ठिकाणी पोहोचला. यावेळी विविध संघर्ष बालकाने हातातील लोखंडी पाईप मयत गणेश यांच्या डोक्यात मारल्याने गणेश हा जखमी झाला. सोलापूर येथे उपचार सुरू असताना दि. १८ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. यानंतर सुनीतासह चौघांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि गिरीजा मस्के या करीत आहेत.

