करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

रोहित पवार फाउंडेशनच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी मुस्तकीम पठाण यांची निवड

करमाळा


शहरातील सर्व समाजाशी सामाजिक बांधिलकी ठेवणारे व सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहणारे रोहित पवार यांचे करमाळा शहरातील विश्वासू सहकारी मुस्तकीम पठाण यांची महाराष्ट्र राज्यातील रोहित पवार फाउंडेशन सर्व सामाजिक कार्य संपूर्ण महाराष्ट्रात काम करते या फाउंडेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी मुस्तकीम पठाण यांची निवड झाली आहे.

या निवडीचे पत्र रोहित पवार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष ऋषिकेश करभाजन यांनी दिले. करमाळा शहरात व करमाळा तालुक्यात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन व सर्व समाज घटकांशी असणारी सामाजिक बांधिलकी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना खरा आधार व ऊर्जा देणारा व अन्याय विरुद्ध लढणारा लढवय्या कार्यकर्त्याला करमाळा तालुक्याची जबाबदारी दिल्याबद्दल करमाळातील सर्व समाजातून व सर्व सामाजिक संघटनेकडून त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेऊन अल्पसंख्याक समाजातील युवा नेतृत्वास तालुका अध्यक्षपदी निवड करून माननीय रोहित पवार यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.

या निवडीबद्दल सकल मुस्लिम समाज करमाळा चे मार्गदर्शक कलिम काझी, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद , माजी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, अर्बन बँकेचे माजी संचालक फारूक जमादार, जमिएत उलमा हिंद चे तालुकाध्यक्ष मौलाना मोहसीन मार्गदर्शक समीर शेख, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद ओबीसी ऑर्गनायझेशनचे तालुकाध्यक्ष एडवोकेट नवीन काझी, एडवोकेट आलिम पठाण,

ads

प्राध्यापक इब्राहिम मुजावर, रहनुमा चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिव सुरज शेख, कलाम फाउंडेशनचे सचिव रमजान बेग, शालेय समितीचे उपाध्यक्ष इक्बाल शेख, उद्योजक हाजी अतीक बेग, उद्योजक हाजी सादिक शेख, उद्योजक जावेद सय्यद हाजी इमरान शेख , इमित्याज पठाण माहिती अधिकार कार्यकर्ते अलीम खान, युवक नेते अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख, फिरोज बेग, कलंदर शेख यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE