अमृतमहोत्सवा निमित्ताने खांबेवाडीत मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा – अमोल जांभळे
स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धांचे आयोजन केले असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मनसेचे उपाध्यक्ष अशोक गोफणे यांनी केले आहे.

निबंध स्पर्धेसह इतर शालेय स्पर्धा व गावातील नामवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी चे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती गोफणे यांनी दिली.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील व मनसेचे तालुका अध्यक्ष संजय घोलप हे उपस्थित राहणार आहेत. तर परिसरातील सुज्ञ नागरिकांनी संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
सदरचा कार्यक्रमाचे निमंत्रण म्हणुन मुख्याध्यापक खांबेवाडी जिल्हा परिषद शाळा पोपट पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील नरुटे आजिनाथ भैय्या शिंदे, विजय खटके, रुपेश लांडगे आदीसह ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.