वंजारवाडी खुन प्रकरणात एकजण पोलिसांच्या ताब्यात
करमाळा समाचार
आज सकाळी दहाच्या सुमारास वंजारवाडी तालुका करमाळा येथे एका वृद्ध व्यक्तीला डोक्यात खोरे मारून जखमी केले होते. त्यानंतर संबंधित व्यक्ती उपचाराने यापूर्वी मयत झाला होता. या प्रकरणी पोलीस संशयिताच्या शोधात होते. त्यास पकडण्यास करमाळा पोलिसांना यश आले असून एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.

मूळचे इंदापूर तालुक्यातील अकोले येथील वामन दराडे वय 60 यांचा वंजारवाडी येथे डोक्यात खोरे मारुन खुन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा पोलिसांनी शोध घेतला व त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो अल्पवयीन असल्याचे लक्षात आले.

मयत व्यक्ती हा सावत्र आईला आपल्या कुटुंबीया विरोधात मदत करीत असल्याच्या राग मनात धरून खुन केला असावा असा संशय संशयिताच्या सावत्र आईने व्यक्त केला आहे. सकाळी दोघेही शेतात काम करण्यासाठी गेले. त्या ठिकाणी संशयित व दराडे हे शेतात काम करण्यासाठी गेला होता. त्यावेळी दराडे यांच्या डोक्यात खोरे घालून गंभीर जखमी केले पळून गेला होता. सदर प्रकरणात घटना घडल्यानंतर पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाने संशयीतास शोधुन काढले.