करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

जावयाच्या बांधावर चुलता पुतण्यात वाद ; चुलत्याचा खुन – पुतण्यांना अटक

करमाळा समाचार 

जावयाच्या शेतातील बांधावरील झाड तोडून चारीत का टाकले याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या सासर्‍याला त्यांच्याच पुतण्यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून व शिवीगाळ करीत मारहाण करून छातीत चाकू भोकसला. यावेळी उपचारापूर्वीच चुलत्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार अर्जुन नगर ता. करमाळा येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे.

तात्याबा बाबुराव रोकडे व नागनाथ उर्फ नागेश बाबुराव रोकडे दोघे रा. अर्जुन नगर ता.करमाळा असे दोघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर या प्रकरणात भुजंग सावळा रोकडे वय ६५ हे मयत झाले आहेत. याप्रकरणी सतीश भुजंग रोकडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. सदर घटनेची माहिती करमाळा पोलिसात दिल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे व दोघांनाही अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत भुजंग रोकडे यांची अर्जुन नगर येथे शेती आहे. त्यांच्या शेजारी त्यांच्या पुतण्याची शेती आहे व पुतण्याच्या शेजारी भुजंग रोकडे यांची जावई राजेंद्र घाडगे यांची शेती आहे. पूर्वीपासूनच भुजंग रोकडे व पुतण्यांची बांधावरून कायम वाद राहिलेले आहेत. यापूर्वीही बैठका घेऊन दोघातील वाद सोडवण्याचा प्रयत्न झालेला होता. झालेल्या नुकसानानंतर मोबदला देऊन सदरची भांडणे मिटवण्यातही आली होती. परंतु कायमच या दोन्ही कुटुंबांमध्ये शेतीच्या बांधावरून वाद सुरूच होते.

ads

शनिवारी भुजंग रोकडे यांची जावई राजेंद्र घाडगे यांच्या बांधावरील लिंबाचे झाड तात्याबा व नागेश रोकडे यांनी जेसीबीच्या साह्याने तोडले व राजेंद्र रोकडे यांच्या चारीमध्ये फांद्या टाकल्या. यामुळे चारी बंद झाली हे पाहून भुजंग रोकडे यांनी त्या दोघांना चाऱ्यामधील फांद्या काढण्याच्या सांगितल्या. यावेळी “तुझा इथे बोलण्याचा काहीही संबंध येत नाही” असे म्हणून तात्याबा व नागेश यांनी भुजंग रोकडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी भुजंग रोकडे यांच्यासोबत झालेल्या वादादरम्यान तात्याबा रोकडे यांनी खिशातील चाकूनी भुजंग रोकडे यांच्या छातीच्या डाव्या बाजूस भोकसले. यावेळी भुजंग रोकडे हे जखमी होऊन पडले अशी तक्रार सतिश रोकडे यांनी दिली. जखमी भुजंग रोकडे यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE