ऑनलाईनचा शिक्षणाचा होतोय गैरवापर ; अल्पवयीन मुलांना आपणच ढकलतोय अंधाराच्या खाईत – मुले वळली गुन्हेगारीकडे
ऑनलाईन अभ्यास व क्राईम सिरिज धोकादायक …
क्राईम सिरीज, वेबसीरिज व टीव्ही पाहुन तसेच ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मुलं-मुली कोणत्या दिशेने वळतील याचा नेम बांधणे आता अशक्य झाले आहे. ज्या त्या वयात जे ते ज्ञान मिळणे अपेक्षित असताना आता मात्र अल्पवयीन मुलांना नको ते ज्ञान सहज शक्य होऊ लागले आहे. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाइल तर घरात टीव्ही आहे. त्याच्या माध्यमातून कमी वयात जास्त ज्ञान देणारा गुरुच त्यांना मिळाल्याचे दिसून येत आहे.


पूर्वी मोबाईल नव्हते टीव्ही चे प्रमाण अल्प प्रमाणात होते. त्या काळात मोजके कार्यक्रम पाहिले जायचे. परंतु कोरोना आला व लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन अभ्यासाने प्रगती केली. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या हातात वायफाय सह मोबाईल देण्यात आले. मुला मुली अभ्यासासह इतर उद्योगही करू लागली. त्यामुळे आता हाच ऑनलाईन अभ्यास धोकादायक बनू पाहत आहे. पूर्वीचे विद्यार्थी अभ्यासात रमत असत इंटरनेटचा चा वापर मोजका व अधिक माहिती मिळवण्यासाठी केला जात होता. परंतु आजची पहाट इंटरनेटने सुरू होते व रात्र इंटरनेट मध्येच जाते. त्यामुळे मुलांच्या भविष्य अंधकाराकडे जाण्याची दाट शक्यता वाढली आहे.
नुकताच औरंगाबाद येथे एका प्राध्यापकांच्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलाने क्राईम सिरीज पाहून त्या प्राध्यापकाचा गळा चिरून व हाताची नस कापून निर्घुणपणे खून केला. याचा तपास औरंगाबाद पोलिसांनी करत असताना त्यांच्या हाती धागेदोरे लागले. यातूनच संबंधित अल्पवयीन मुलाने हे कृत्य क्राईम सिरीज पाहून केल्याचे उघडकीस आले आहे. साधारणतः त्या मुलाला ही माहिती मिळणे त्यातले ज्ञान मिळणे हे अशक्य होते. परंतु हे ज्ञान देण्यासाठी ही आपणच जबाबदार आहोत. आपण त्याला मित्र-मैत्रिणी मधून बाजूला काढून खेळाची मैदाने जवळ करण्याची सोडून त्याला आपण 24 तास मोबाईल व वाय-फाय सुविधा पुरवली. त्यातच गुंतून शुल्लक गोष्टीतून एकाचा खून करण्यापर्यंत मजल मारली. आज हाच मोबाईल त्याच्या हातात नसला असता तर आज प्राध्यापक सुखरूप असले असते.
त्याशिवाय दहावी पासूनच प्रत्येक मुलीच्या व मुलाच्या हातात मोबाईल आल्याने आता मैत्री वाढण्याचे हे प्रमाण वाढले आहे. रोजच मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे ऑनलाईन वर होणारी मैत्री व त्यातून वाटणारे आकर्षण तसेच ऑनलाईन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येणारे हेच विद्यार्थी भावी काळात या अभ्यासातून भविष्य घडवतील का अंधारात जातील हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. विविध गेम्स सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्या गेम च्या माध्यमातून चॅटिंग का ऑप्शन ही आहे. विशेष म्हणजे या गेम मर्यादित तालुका किंवा जिल्ह्यापुरता नसून संपूर्ण देश विदेशात आहेत. त्यामुळे त्या गेम खेळत असताना त्याठिकाणी चॅटिंग ही केली जाते. याच दरम्यान समोर असलेली व्यक्ती ही भारतीय आहे का परदेशी आहे ? पाकिस्तानी आहे का ? उत्तर प्रदेशचे आहे हे कळणे सुद्धा कठीण आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या मुलांच्या संपर्कात आपल्या मुली येत असतात त्यावेळी आपली मुलगी व मुलगा कोणाच्या संपर्कात येत आहे व ऑनलाइन अभ्यासाच्या माध्यमातून काय करत आहे यावर लक्ष ठेवणेही गरजेचे बनले आहे.
सध्या सर्व काही महाग होत असताना ऑनलाइन सेवा पुरवणारी माध्यमे मात्र स्वस्त होत चालले आहेत. पण ही स्वस्त होणारी माध्यमे आपल्या कितपत फायद्याचे आहेत. याच्या पासून आपल्याला फायदा होतोय का तोटा हे पालकांनी वेळीच जाणून घेतलेले बरे, आपल्या मुलांना मुबलक प्रमाणात अशा साधनांचा वापर करून देणे व टीव्ही वापरा किंवा नका वापरू पण त्या टीव्हीवर मोजकेच कार्यक्रम पाहण्याची मुभा असावी, असेच कार्यक्रम मुलांनीही पहावे. अन्यथा आज-काल कार्टून ही विध्वंसक होत चालले आहेत. लहान मुलांनाही तात्काळ राग येऊ लागले आहेत भांडणे करू लागली आहेत अशी शिकवण सध्याच टीव्हीच्या माध्यमातून मिळत असेल तर आपली पुढची पिढी ही बरबाद झाल्या शिवाय राहणार नाही.