पांडे सबस्टेशन वरून सिंगल फेज वीज पुरवठा कार्यान्वित
प्रतिनिधी – करमाळा समाचार
2012 साली काम पुर्ण झालेल्या आणि प्रत्यक्षात 2013 पासून कार्यान्वित झालेल्या पांडे सबस्टेशन वरून अद्यापही सिंगल फेज वीज पुरवठा कार्यान्वित केलेला नव्हता . आ.संजयमामा शिंदे यांनी यामध्ये लक्ष देऊन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. व्ही. जाधव यांना सूचना करून सिंगल फेज वीजपुरवठा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार आज पांडे सबस्टेशन वरून शेलगाव फिडर व पांडे फीडवरून पांडे व गुळसडी या गावांना आजपासून सिंगल फेज वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी श्री दत्ताभाऊ जाधव ,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री विलासकाका राऊत यांच्या हस्ते व गुळसडी चे माजी सरपंच मानसिंग खंडागळे , अशपाक जमादार तसेच शेलगाव , गुळसडी व पांडे येथील ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे श्री के. ए. वाघमारे , श्री एस. एस .पवार या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महावितरणच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुळसडी येथील दत्ता भंडारे , शेलगाव येथील सुभाष पायघन , राहुल कुकडे , अजित काटूळे, सुनील माने , बापू माने , प्रज्वल माने, मयूर वीर , मारुती माने , संदीप पाटील , सचिन वीर , पांडे येथील सुनीलभाई मुजावर , समदभाई मुजावर , ज्ञानदेव शिरसागर , ज्ञानदेव दुधे , अर्जुननगर येथील समाधान भोगे आदी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षापासून सिंगल फेज वीजपुरवठ्याचे भिजत पडलेले घोंगडे आ. संजयमामा शिंदे यांच्यामुळे निकालात निघाले आणि सिंगल फेज वीजपुरवठा सुरू झाला. याबद्दल पांडे ,गुळसडी व शेलगाव येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.