राजुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद बाजाराचे आयोजन
करमाळा समाचार संजय साखरे
राजुरी तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दप्तर मुक्त शनिवार या अभियाना अंतर्गत बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या व साहित्य विक्रीसाठी आणले होते . यामध्ये गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उस्फुर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांकडून खरेदी केली.

यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान मिळावे,त्यांच्यामध्ये व्यावहारिक जाण यावी, बिन भिंतीच्या शाळेबाहेरील जग त्यांना कळावे, आर्थिक बाबीची जाण व्हावी व समाजाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने या बाल आनंद बाजाराचे आयोजन केले होते.
या बाजाराला गावकऱ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवला. गावातील आबाल वृद्ध या बाजारात सहभागी झाले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील विविध प्रकारच्या पालेभाज्या ,मेवा मिठाई, फरसाण व भेळ विक्रीसाठी आणले होते .यामध्ये जवळपास दहा हजार रुपयांची उलाढाल झाली.
या बाजाराचे उद्घाटन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अंकुश दादा साखरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव ,उपाध्यक्ष वसंत भोईटे ,नवनाथ दुरंदे ,आर आर बापू साखरे ,ग्रामसेवक गलांडे भाऊसाहेब, सोमनाथ शिंदे, रेवण बोबडे, दीपक साखरे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ हजर होते..