करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

कावळवाडीत पाटील गटाला धक्का ; विद्यमान सरपंच तुषार हाके यांसह कार्यकर्त्यांचा महायुतीत प्रवेश

करमाळा समाचार

कावळवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तुषार हाके यांनी नारायण पाटील गटाला राम राम करत भाजप प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या उपस्थितीत महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय बागल यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून करमाळा माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीत प्रवेश सत्र सुरू असून नारायण पाटील व संजय मामा शिंदे गटातून महायुतीला साथ देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

यावेळी आदिनाथ/मकाई सहकारी साखर कारखाना आजी माजी संचालक शिवसेना भाजपचे पदाधिकारी हितचिंतक आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच तुषार हाके यांनी बोलताना सांगितले की युवा नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत तर अजूनही पुढील काही दिवसात प्रवेश होणार आहेत अशी माहिती बागल कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE