करमाळा पोलिसांची कामगिरी ; चोरी करून फरार झालेला आरोपी बारा तासात पकडण्यास यश
करमाळा समाचार
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाली की करमाळा मध्ये किल्ला विभागात एक चोरी करून फरार झालेला आरोपी फिरत असल्याची माहिती मिळाल्याने करमाळा पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक कोकणे यांनी लागलीच पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पो कॉ तोफिक काझी, पो कॉ अमोल जगताप यांचे पथक रवाना केले.

पथकाने करमाळा शहरात सुभाष चौक येथे सापळा रचून करमाळा पोलीस ठाणे कडील चोरी मधील फरारी संशयीत आरोपी सागर अरुण कांबळे राहणार रोसेवाडी तालुका करमाळा यास अटक केली. सदर आरोपी वर करमाळा पोलीस ठाणे येथे 379 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्याच्याकडून लोखंडी स्टील, लोखंडी ग्रील,नवीन पत्रे चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदरच्या आरोपीकडून अजून गुन्हे ओपन होण्याची शक्यता आहे सदर आरोपी करमाळा न्यायालयासमोर उभे केले असता त्यास तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे साहेब,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष देवकर हे करत आहेत.