नगरपरिषद, जिल्हा परिषद व महानगरपालिकांचा टप्प्याटप्याने कार्यक्रम !
करमाळा समाचार
नुकत्याच झेडपी व पंचायत समितीच्या आरक्षणासह नगरपरिषदा व महानगरपालिकेच्या जागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. लवकरच टप्प्याटप्प्याने सर्व निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

सुरुवातीला नगरपरिषद व नगरपालिका यांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर मध्ये सदरच्या निवडणुका होतील त्यानंतर लगेचच वीस दिवसांच्या फरकाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही घेण्यात येऊ शकतात.
नगरपालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषद झाल्यानंतर सर्वात शेवटी महानगरपालिकेच्या निवडणूक जाहीर होण्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे तीन टप्प्यात कार्यक्रम होताना दिसून येत आहे.

