करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

वडीलांचा घेतलेला जबाब न पटल्याने पोलिस मुलाने जबाबाचा कागद फाडला ; गुन्हा दाखल

करमाळा समाचार

जमिनीची मोजणी करत असताना आलेल्या अधिकाऱ्यांच्या हातातील पंचनाम्याचा कागद फाडल्या प्रकरणी पुणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार हा दि १८ जून रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केम येथील गट नंबर ५६७ मध्ये घडला आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी मिरा नागटिळक यांनी विकास बाळू देवकर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केम ता. करमाळा येथील गट नंबर ५६७ मध्ये रस्त्यासाठी तहसीलदार यांच्याकडे तारखा सुरू आहेत. दरम्यान मंडळ अधिकारी नागटिळक या सदरच्या ठिकाणी स्थळ पाहणी व पंचनामा करण्याकरता १८ जून रोजी गेल्या होत्या. यावेळी वादी व प्रतिवादी यांचे जबाब नोंदवले त्यानंतर त्या ठिकाणी संशयित आरोपी विकास देवकर हे आले व त्यांनी त्यांचे वडील बाळू देवकर यांनी दिलेला जबाब वाचून पाहण्यास कागद मागितला.

यावेळी त्यांना सदरचा कागद दिल्यानंतर त्यांनी तो वाचून पाहिला व सदर जबाब मध्ये काही शब्द राहिलेले आहेत असे म्हणाला. त्यावेळी मंडळ अधिकारी नागटिळक यांनी जबाब योग्य असल्याने पूर्ण लिहिलेला आहे असे सांगितले. त्यावर विकास याने सदरचा जबाबदाचा कागद मंडळ अधिकाऱ्यांच्या हातातून घेऊन फाडुन टाकला व स्वतःच्या हस्ताक्षरात जबाब लिहिला व त्यावर वडिलांची स्वाक्षरी घेतली आणि तो जबाब ग्राह्य धरावा अशी मागणी करू लागला.

ads

सदर कागद मंडळ अधिकाऱ्यांनी सोबत ठेवला व वरिष्ठांची चर्चा करून विकास देवकर यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE