महसुल दिनानिमित्त तहसिल कार्यालयात कार्यक्रम ; ग्राहक पंचायत सदस्यांची हजेरी
करमाळा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा युनिट च्या वतीने महसूल दिनानिमित्त तहसिल कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात महसूल अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी करमाळा तहसीलदार मा. समीरजी माने साहेब, नायब तहसीलदार मा. विजय जाधव साहेब, महसूल नायब तहसीलदार मा सुभाष बदे साहेब, नायब तहसीलदार मा. दादासाहेब गायकवाड साहेब, कार्यालयातील सर्व अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, सर्व बंधू भगिनी चा सन्मान केला. तसेच ग्राहक पंचायत अध्यक्ष मा. ॲड शशिकांत नरुटे सर कोषाध्यक्ष मा. भिमराव कांबळे सर सदस्य मा. शिवाजी वीर उपस्थित होते.
