शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
करमाळा समाचार
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक , थोर शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त ,डॉ लहू श्रीपती कदम विद्यालय वांगी 1 येथे बुधवार दिनांक 27/09/2023 रोजी सभेचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा येथील कान, नाक, घसा तज्ञ डॉ अमोल घाडगे तर प्रमुख पाहुणे रयत मधील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बिभीषण पाटील हे होते. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते भारत महाविद्यालय जेऊर येथील प्राध्यापक डॉ संजय चौधरी यांनी आपल्या भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञानिष्ठ वैचारिक प्रगती साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अमोल घाडगे यांनी शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रम प्रसंगी विद्यालयास देणगी देणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.कर्मवीर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी केले.सूत्रसंचालन सचिन खाडे यांनी तर आभार प्रदर्शन सयाजीराव जाधवर यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी तानाजी काका देशमुख, निलेश भोसले,हरिभाऊ तकिक, मगनदास दिवटे,उदयसिंह देशमुख, भारत साळुंखे,राजकुमार देशमुख,दत्तात्रय देशमुख,रामचंद्र सुळ,नीरज देशमुख, सोनाली बुधकर , सुवर्णा वैद्य, तानाजी खरात ,केशव भुतकर, स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.