आमदारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा करमाळा येथे निषेध ; कर्नाटक प्रकरणाचे पडसाद
प्रतिनिधी सुनिल भोसले
फुलकेशीनगर बेंगलोर कर्नाटक राज्य येथील काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या वर झालेल्या हल्ल्याचा निषेध करमाळा तहसील येथे करण्यात आला. यावेळी ननवरे बोलताना म्हणाले, कर्नाटक राज्यातील वडार समाजाचे आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या निवासस्थानी दिनांक 4/8/2020/रोजी सोशल मीडिया वरील पोस्ट निमित्त करून काही समाजकंटकांनी जीवित आणि करण्याच्या उद्देशाने हल्ला करून वाहनासह अनेक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तसेच त्यांचे निवासस्थानही पेटवून दिले. या कृत्याचा वडार समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून तहसीलदार करमाळा समीर माने यांना निवेदन दिले.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्यावर काही विकृत्त प्रवृतीच्या लोकांनी केलेल्या हल्ल्याचा धिक्कार करून त्यांच्यावर झालेल्या निदनींय प्रसंगात त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील वडार समाजाबरोबरच देशातील वडार समाज त्याच्या पाठिशी उभा आहे. कर्नाटक सरकारने यासंदर्भात ठोस कठोर पावले उचलून अशा माथेफिरू प्रकृतीच्या लोकांना जागेवरच पायबंद घालावेत अन्यथा येणाऱ्या कालावधीत संपूर्ण देशातील वडार समाज रस्त्यावर उतरून या घटनेविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा ओसिसिआय वडार समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ननवरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, गोविंद तांदळे, महाराष्ट्र महिला युवा संघटक प्रियदर्शनी चव्हाण, करमाळा तालुका उपाध्यक्ष संतोष चौगुले, सुनील जाधव तसेच वडार समाजातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
