करमाळासोलापूर जिल्हा

करमाळयात नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध ; गाढवाच्या गळ्यात बांधली राणेंची प्रतिमा

करमाळा समाचार 

नारायण राणेंचे करायचं काय ? खाली मुंडी वर पाय ” नारायण राणे यांचा जाहीर निषेध अशा प्रकारच्या घोषणा देत आज करमाळा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिवसैनिकांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी करमाळा येथील सुभाष चौक येथे केंद्रीय मंत्री गाढवाच्या गळ्यात नारायण राणे यांची प्रतिमा लावून निषेध केला.

महाराष्ट्रात सर्वत्र नारायण राणे यांच्यात या वक्तव्याचा निषेध होत आहे. त्याचे पडसाद आता करमाळ्यातही उमटत आहेत. करमाळा येथील शिवसैनिकांनी सुभाष चौक येथे सकाळी साडेअकराच्या दरम्यान हे आंदोलन केले.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे, युवासेना शहराध्यक्ष विशाल गायकवाड माजी शहरप्रमुख संजय शीलवंत यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE