राजेश्वर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
करमाळा समाचार -संजय साखरे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये करमाळा तालुक्यातील १४ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये राजुरी येथील श्री वैजनाथ स्वामी सेवा मंडळ संचलित श्री राजेश्वर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रशालेतील जवळपास १८ विद्यार्थ्यांना ८५ %च्या पुढे गुण मिळाले आहेत. या परीक्षेसाठी विद्यालयातून ५६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यामध्ये १) कु.वृषाली सावता शिंदे -९४.६०%
२)पायल विजय गरड-९४.२०%
३)शुभम रामदास शिंदे -९३.४०%
यांनी प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव जगताप सर, मुख्याध्यापक अनिल झोळ सर व राजुरी ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
