15 ऑगस्ट पासुन निर्बधातुन सुटका ; सोलापुरातील त्या पाच तालुक्यांचे काय ?
करमाळा समाचार
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर निर्बंधातून सुटका देण्याची घोषणा या वेळी घेण्यात आली असली तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घालून दिलेले निर्बंध कायम असतील. त्यामुळे दि 13 पासून कडक निर्बंध लागू होणारच आहेत.

जिल्ह्यात तसेच जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये व्यापाऱ्यांकडून निदर्शने व विरोध दर्शवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे लागले आहे. परंतु सध्या तरी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कसलेही बदल केलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राने जाहीर केलेले अनलॉक आणि जिल्ह्यात सुरू असलेले लॉक यामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिल्या प्रमाणे 15 ऑगस्ट पासून राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल यासह दुकाने रात्री दहा वाजले पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन रोज घेतल्यानंतरच मॉल मध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. शिवाय धार्मिक स्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.