E-Paperकरमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

बागलांसाठी नवसंजीवनी देणारी सभा ; मुख्यमंत्री शिंदेंनी बागलांसाठी दिले अभिवचन

करमाळा समाचार 

तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना, एमआयडीसी, मकाई व आदिनाथ सहकारी साखर कारखाना, शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, धरणग्रस्तांना पर्यायी जमिनी, केळी संशोधन केंद्र व छत्तीस गावातील बेंद ओढ्याचा पाणी प्रश्नासाठी हे सोडवण्यासाठी मागे ठाम उभा राहण्याचं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर दिग्विजयच्या नावातच विजय असल्याने विजय नक्की होणार असल्याचे शिंदे म्हणाले त्यामुळे मी कायम दिग्विजयच्या पाठिशी राहिल असे अभिवचन यावेळी दिले.

ते करमाळा येथे दिग्विजय बागल यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी लाल कलर व कोरी पाने दाखवत संविधानाचा जो अपमान केला त्यावरही त्यांना खडे बोल चुनावले. तर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे कोरोना काळात फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते त्यावरूनही ठाकरे यांना टोले लगावले. यासभेमुळे जुने संवगडी पुन्हा बागल यांच्या सोबत जुडल्याने बागल गटात कमालीचा उत्साह बघायला मिळाला.

politics

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते आणि हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे होते हे सरकार हप्ते भरणारे आहे. आम्हाला योजनांच्या चौकशी करून दोषी ठरवून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जाते. पण सामान्य जनतेसाठी शंभर वेळा जेलमध्ये जायला तयार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा येथे बोलताना केले. तर उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांची किंवा फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांची सरकार नसून सीएम म्हणजे मुख्यमंत्री नव्हे तर कॉमन मॅनचे हे सरकार आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजप महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष रश्मी बागल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मंगेश चिवटे, आदिनाथचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE