करमाळ्यात सोनार समाजाच्या वतीने संत नरहरी महाराजांची पुण्यतिथी साजरी
करमाळा समाचार
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त करमाळा येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली व अल्पोउपहार करून महाप्रसादाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमाचे आयोजन निलेश शहाणे यांच्यासह सहकाऱ्यांनी केले होते.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे, गणेश शहाणे, किरण बोकन, सतीश माळवे, उमेश माळवे, अविनाश शहाणे, गणेश माळवे, शामभाऊ ढाळे, पर्शोत्तम बोकन, रत्नाकर आडाणे, अविनाश शहाणे, विशाल माळवे, निलेश शहाणे, सोमनाथ बागडे, नंदकुमार बागडे, गणेश शहाणे, सागर माळवे, हेमंत शहाणे, स्वरूप आडाणे, सुधीर शहाणे, वेदांत उदावंत, स्वरूप माळवे, अक्षय बोकन, सागर बोकन, ओंकार ढाळे व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

संत नरहरी महाराजांची थोडक्यात माहीती …
संत नरहरी महाराज वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्र- कृष्णदास- हरिप्रसाद- मुकुंदराज- मुरारी- अच्युत आणि नरहरी नारायण अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. त्यांचा जन्म श्रावण शुक्ल १३ला इ.स.११९३ शके १११५ च्या आसपास पंढरपूर येथे झाला होता.
संत नरहरी सोनार यांची जयंती श्रावण शुद्ध/शुक्ल त्रयोदशी या दिवशी, आणि पुण्यतिथी माघ वद्य तृतीयेला असते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा मंगळवेढ्या जवळील ब्रह्मपूरी गावच्या श्रीपती पोतदार ( वेदपाठकाची ) मुलगी तर मुलांची नावे नारायण व मल्लीनाथ शी होती. त्यांचे वडील श्री अच्युतराव व आईचे नाव सावित्री बाई असे होते. त्यांना नाईक, पोतदार( हे उपनाम दक्षिण भारतात पत्तार या शब्दापासुन झाले म्हणून विश्वकर्मीय सोनारांना ही उपाधी आहे.
पुर्वी सोनार समाजात पोटशाखा नव्हत्या. समाज व्यापारासाठी इतरत्र गेला तेव्हा काल देश परत्वे खान पान, राहणी बदलली ब्राह्मण – पांचाळ व दैवज्ञ, क्षत्रीय – लाड व आयर/ अहिर, वैश्य – वैश्य, लिंगायत, बंजारा, सोनी व इतर असे वर्ण व्यवस्था झाली त्या अगोदर संपुर्ण समाज विश्वकर्मा ब्राह्मण समाजच होता. सगळे एकच असून नंतर भेद निर्माण झाला. ), सोनार अस्या उपाध्या प्राप्त होत्या म्हणून महामुनी ऐवजी सोनार नावाने ओळखले जातात.