करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

वाळु माफियाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या समितीसह सरपंच रडारवर ; एकावर बडतर्फीची शिफारश

कंदर तालुका करमाळा येथे वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी तब्बल ८० ब्रास वाळू मिळून आली आहे. त्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. सदरची कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायतीलाही कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे. त्यामुळे हलगर्जीपण करणाऱ्या ग्रामपंचायत व सरपंचांना एक प्रकारे इशारा ठोकडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता संबंधित समिती तहसिलदारांच्या रडारवर आहे. अशी कारवाई झाली तर सगळे टाळ्यावर येतील.

कंदर येथील उजनी जलाशयाच्या परिसरात सरडे वस्ती व बार्शी शहर पाणीपुरवठा पाईपलाईन जवळ बेकायदेशीर रित्या वाळू उपसा उत्खनन करीत असलेले निदर्शनास आले आहे. यावेळी तहसिलदार ठोकडे यांनी धडक कारवाई केली आहे. याठिकाणी ८० ब्रास वाळु मिळुन आली सर्व वाळु तहसिलदार यांनी जप्त केली आहे. याबाबत कंदर ग्रामपंचायत अधिनस्त असलेली ग्रामस्तरीय समितीने सदर वाळू उपसा होऊ नये याबाबत कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. तसेच सदर उत्खनन करीत असले बाबत तहसिल कार्यालयास लेखी अथवा तोंडी कळवले नाही. यामध्ये शासनाचे आर्थिक नुकसान झालेले दिसून येते.

तरी सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे नमूद करत या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्तरीय समिती तसेच सरपंच पद बरखास्त करणे बाबत तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवला आहे. यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने अहवाल मागवण्यात आला आहे. सदर अहवालात योग्य कारणे मिळाली नाही तर संबंधितावर बरखास्तीची कारवाई होऊ शकते. असा इशारा यावेळी तहसीलदार ठोकडे यांनी दिला तर या कारवाईच्या माध्यमातून गावोगावी ग्रामपंचायत कडून होणाऱ्या अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष करीत असलेल्या ग्रामपंचायतींना हा एक प्रकारचा इशारा आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE