सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या ग्रामीण उपाध्यक्षपदी गुंड यांची निवड.
करमाळा समाचार
सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघातील संघटनात्मक कार्याची दखल घेऊन लाल बहादूर शास्त्री विद्यालय सालसे तालुका करमाळा येथील कलाशिक्षक श्री. विजयकुमार गुंड यांची जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) या पदावर निवड करण्यात आली. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक कन्ना सर व सचिव श्री देवेंद्रजी निम्बर्गीकर सर, उपाध्यक्ष श्री गणेश तडका सर , संघटनेचे कार्याध्यक्ष श्री सुरेश मलाव सर यांनी यावेळी निवडीचे पत्र दिले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ शाखा करमाळा व माळशिरस चे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि श्री छञपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे व श्री छञपती शिवाजी फाॅऊडेशन समिती कार्यक्षेत्र-महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री सागरराजे देशमुख मुख्याध्यापक श्री लावंड सर यांनी गुंड सर यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
