करमाळा

कु.श्रेया कोकीळ हिची सेंट्रल युनिवरसिटी ऑफ तामिळनाडू थरूर येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवड

करमाळा:-

कु.श्रेया शरद कोकीळ हिची सेंट्रल युनिवरसिटी ऑफ तामिळनाडू थरूर येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवडक 9 विद्यार्थ्यांसाठी निवड झाली आहे.याअगोदर तिने जम्मू काश्मीर येथे रिसर्च स्कॉलर म्हणून 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे यानंतर तिची तामिळनाडू येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल करमाळा भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी तिचे विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आईवडिलांचा, गुरुजनांचा लौकिक वाढवावा व आपले करियर उज्वल करावे.यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, बाळासाहेब कुंभार, संजयआण्णा घोरपडे,श्याम सिंधी, बाळासाहेब होसिंग,धर्मराज नाळे,दादासाहेब देवकर,दासाबापु बरडे, अमोल पवार,नितीन झिंजाडे, विष्णू रणदिवे,मच्छिंद्र हाके, सोमनाथ घाडगे,आजिनाथ सुरवसे, विनोद महानवर, जयंत काळे पाटील,हर्षद गाडे, किरण शिंदे,आबा वीर, कैलास पवार, समाधान काळे, संदीप काळे, लक्ष्मण काळे, किरण बागल, प्रकाश ननवरे,विशाल घाडगे, मनोज मुसळे,महादेव गोसावी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE