सुजित देशमुखची नवोदय साठी निवड
संजय साखरे – करमाळा
कुंभारगाव ता करमाळा येथील सुजित महेंद्र देशमुख याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे .तो सध्या श्री जगदंबा विद्यालय,राशीन येथे शिकत आहे.सध्या कोरोना मुळे शाळा बंद असताना देखील सुजित ने नवोदय विद्यालय परीक्षेत यश मिळवले आहे. तो मकाई साखर कारखान्याचे कामगार श्री महेंद्र देशमुख यांचा मुलगा आहे.त्याला श्री जगदंबा विद्यालय राशीन चे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या या यशाबद्दल कुंभारगाव ग्रामस्थांच्या वतीने नुकताच त्याचा सत्कार करण्यात आला. त्याच्या यशाबद्दल मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री दिग्विजय बागल यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
