फारकत घेतलेली राष्ट्रवादी एकाच मंचावर ; करमाळयात राष्ट्रवादीची एकजुट
करमाळा समाचार
अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर संजय मामा अनेकदा राष्ट्रवादीच्या मंचावर दिसले. ते अधिकृत राष्ट्रवादीचे काम करतानाही दिसले. जिल्ह्याचे नेते म्हणून राष्ट्रवादीत त्यांचा पुरस्कार केला जाऊ लागला. पण स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थोडं अंतर राखून संजय मामा मनापासून राहत होते. पण या सर्वांवर आता पडदा पडला असून सर्वजण एकाच छताखाली आल्याचे दिसून आले. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी संजय मामांचे नेतृत्व मान्य केल्याचे दिसून येत आहे.

त्याला निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापनदिनाचे. करमाळा येथे आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . ज्येष्ठ नागरिक श्री निवृत्ती लोहार यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजा चे पूजन करण्यात आले.
यावेळी करमाळा तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदी शितल क्षिरसागर व कार्याध्यक्षपदी स्नेहल अवचर यांची निवड झाल्याबद्दल तसेच सर्वेश देवकर यांची विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. गोवर्धन चवरे , सौ नलिनी जाधव , श्री सोमनाथ लोहार , श्री अभिषेक आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. संतोष वारे यांनी मानले.
यावेळी करमाळा तालुका राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष भोजराज सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नलवडे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, राष्ट्रवादी किसान सेल तालुका अध्यक्ष सचिन नलावडे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्तात्रय आडसूळ, सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, पदवीधर तालुका कार्याध्यक्ष रवींद्र वळेकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गोवर्धन चौरे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष सर्वेश देवकर ,विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य सचिव सोमनाथ लोहार, विद्यार्थी काँग्रेस हडपसर उपाध्यक्ष विवेक लोहार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष मयुर पाटील, तालुका अध्यक्ष महिला आघाडी नलिनीताई जाधव, शहराध्यक्ष राजश्री कांबळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयमाला चवरे, तालुकाध्यक्ष युवती शितल शिरसागर, तालुका कार्याध्यक्ष युवती स्नेहल अवचर ,नंदिनी लुंगारे यांच्यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.