खराब रस्त्याचा फटका बसल्याने टॅकर मधील सात हजार लीटर पाणी वाया
करमाळा समाचार
दत्त मंदिर ते करमाळा न्यायालयापर्यंत रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाल्याचा फटका आज एका टँकरला बसला आहे. बऱ्याच दिवसांपासून या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. दुरुस्ती करा म्हणून अनेकदा आंदोलने व विनवण्या झाल्या तरी अद्याप या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. पण आज त्या रस्त्यावरून जात असताना एका पाण्याच्या टँकरचा पाटा तुटल्याने त्यात भरलेले जवळपास सात हजार लिटर पाणी हे रस्त्यावर ओतून द्यावे लागले आहे.

माजी आमदार शामल बागल, न्यायालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, बीएसएनएल ऑफिस, करंजकर दवाखाना असे महत्त्वाची ठिकाणे असणाऱ्या या रस्त्याला बऱ्याच दिवसांपासून मोठाले खड्डे पडलेले आहेत. नावापुरती डागडुजी केली जाते. परंतु त्याचा कोणताही फरक पडलेला दिसून येत नाही.

तात्पुरत्या डागडुजी फटका रस्त्याला वारंवार बसत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी चांगला रस्ता करावा अशी मागणी नागरिकांनी तसेच मनसेचे संजय घोलप यांनी केलेली होती. वैयक्तिक त्या ठिकाणी थांबून मुरूम ही टाकून घेतला होता. पण आजही रस्त्याची तीच अवस्था झालेली आहे.
गावातील प्रमुख रस्त्यांवरून मोठ्या गाड्या जाऊ न दिल्याने ऊस वाहतूकदारांना केवळ न्यायालयाच्या बाजूने रस्ता ठेवण्यात आला होता. त्या रस्त्यावरून वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली की सामान्य नागरिकांच्या वाहतुकीसाठी बनवलेला आला हा रस्ता जड वाहतुकीसाठी वापरल्यामुळे रस्त्याची भलतीच दुरावस्था झाली. त्याच दिशेने कचेरी तसेच तहसील कार्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता असल्याने बरीच वाहतूक विद्यार्थी त्या दिशेने जात असतात पण आता हा रस्ता दुरुस्त केव्हा केला जातोय याकडे लक्ष लागून आहे .