करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यात धक्कादायकघटना – पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या

करमाळा समाचार 


तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टी येथे अज्ञात कारणातुन पतीने पत्नीचा गळा खून करून पतीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गुरुवार दि ३ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदरची घटना उघडकीस आली आहे. यावेळी महिला मृत तर पतीने गळफास घेतलेले मृत शरीर मिळुन आले यावरुन पत्नीचा खुन पतीने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला होता.

सुरुवातीला याबाबत करमाळा पोलीस स्टेशनला अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती नंतर मृत मुलाच्या वडीलांकडुन तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या घटनेबाबत कोणालाच काही कल्पना नसुन नेमके कारण पोलिस शोधत आहेत. दोघांवर कोर्टी येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरच्या घटनेमुळे परिसरात दुख: व्यक्त करण्यात येत आहे.

युवराज लक्ष्मण शेरे (वय ३१),रुपाली युवराज शेरे (वय २५) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. याबाबत हाकिकत मयत युवराज शेरे हे कुटुंबीयांसह कोर्टी ता. करमाळा येथील हुलगेवाडी रस्त्यावरील शेरे वस्ती येथे राहत होते. गुरुवार दि ३ रोजी सायंकाळी पाच च्या सुमारास दोघांचे मृतदेह मिळुन आले. साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास घरातील इतर लोक घरी आले असता त्यांना ही परिस्थिती पाहण्यास मिळाली. याबाबत करमाळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली शुक्रवारी सकाळी मयत दांपत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलीस पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक दळवी हे करत आहेत.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE