करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

रायगाव परिसरात एस टी पलटी होऊन अपघात ; गंभीर जखमींना करमाळ्यात दवाखान्यात पाठवले

करमाळा

कर्जतहुन करमाळा कडे येत असताना एसटीचा अपघात होऊन एसटी पलटी झाल्याने मोठा अपघात घडला आहे. या ठिकाणी रायगाव येथील ग्रामस्थ वेळेत पोहोचल्याने त्या ठिकाणी एसटीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. तर वेळेत ॲम्बुलन्स बोलून जखमींना करमाळा येथील रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले जात आहे. यावेळी घटनास्थळी रायगाव व परिसरातील ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले.

एसटी पलटी झाल्याची माहिती मिळताच रायगाव व परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सदर अपघातात जखमींना बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. यावेळी रायगाव येथील रहिवासी आयुब शेख यांनी बसच्या समोरील काच फोडून आत प्रवेश केला व प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास 30 ते 35 प्रवासी गाडीत असल्याची माहिती मिळत आहे. तर त्यातील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याना करमाळा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE