राज्यघटनेतील कलम २१ नुसार जगण्याचा अधिकार अबाधित रहावा म्हणुन विविध मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी- करमाळा समाचार
जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदींचा लाभ भेटावा आणि राज्यघटनेतील कलम २१ नुसार जगण्याचा अधिकार अबाधित रहावा म्हणून ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाहीत अश्यांना प्रतिज्ञापत्रावर रेशन कार्ड देण्यात यावेत, जातपडताळणी समितीकडे प्रलंबित असलेली प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यात यावीत, रेशनकार्ड आणि आधार कार्ड साठी विशेष सहाय्यता कक्ष स्थापन करुन सहा महिन्यात हे काम पुर्ण करण्यात यावे या आणि विविध मागण्यांसाठी आज बहुजन क्रांती मोर्चा ने तहसीलदार यांना निवेदन दिले

यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक सतीश साडेकर, भारत मुक्ती मोर्चा चे तालुकाध्यक्ष हनुमंत विटकर, कार्याध्यक्ष प्रमोद कांबळे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष शहाबुद्दीन शेख, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे तालुकाध्यक्ष निरंजन चव्हाण, डेबुजी युथ ब्रिगेड तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, विद्यार्थी मोर्चा तालुकाध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे, दिपक कांबळे, राहुल आहेर, प्रशांत भोसले, जितेश कांबळे सर, अकबर बेग, अलिम खान, दत्तात्रय गाडे, रोहन कांबळे, मैनुद्दीन शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
