धनगर समाजातर्फे आमदार संजय मामा शिंद यांना निवेदन
करमाळा समाचार – दिलीप दंगाणे
धनगर समाज ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक डॉ शशिकांत तरंगे यांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसात देत करमाळा तालुका धनगर समाजातर्फे आमदार संजय मामा शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती करमाळा तालुका समन्वय नितीन तरंगे यांनी दिली.
धनगर ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉ शशिकांत तरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील 288 विधान सभा आमदारांना 78 विधानपरिषद आमदारांना निवेदन देण्याचे ठरले आहे. त्या अनुषंगाने करमाळा माढा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातील धनगर परिषद यांच्या वतीने देण्यात आले. आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, धनगर समाजाची गेली सत्तर वर्षापासूनची आरक्षणाची मागणी आहे. मी धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती जाती-जमातीच्या आरक्षणासाठी विधानसभेमध्ये धनगर समाजाचा प्रश्न प्रमुख्याने मांडतो. मागील सरकारने जे आदिवासींना ते धनगर समाजाला ज्या बावीस योजना आल्या होत्या त्यासाठी लागणारा एक हजार कोटी निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. करमाळा तालुक्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. मी विधानसभेमध्ये धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी आवाज उठवणार आहे.
धनगर समाज ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक डॉ. शशिकांत तरंगे साहेब यांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसात देत करमाळा तालुका विधानसभेचे आमदार मा. संजय मामा शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित समाज बांधव नितीन तरंगे, आबासाहेब तरंगे, आण्णासाहेब सूपनवर, नानासाहेब ठोंबरे, काकासाहेब ठोंबरे, सुनिल बापू सावंत, प्रविन साडेकर, हंडाळ भाऊसाहेब आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते.