करमाळासोलापूर जिल्हा

समाज कंठकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे – जगन्नाथ जाधव

प्रतिनिधी – करमाळा समाचार 

वीट ता करमाळा येथे आज वीट ग्रामस्थांच्या वतीने कर्नाटकातील बंगळूर मध्ये स्वराज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली म्हणून स्वतःहून कडकडीत बंद पाळण्यात आला

यावेळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी बोलताना विश्वरत्न महात्मा ज्योतिराव फुले विचार मंचचे प्रदेश उपाध्यक्ष श्री जगन्नाथ जाधव यांनी या घटनेचा निषेध करून ज्या समाजकंटकांनी हे दुष्कृत्य केले त्या सर्वांना कठोर शासन करावे अशी मागणी केली. जे कोणी समाज कंठक अशी कृत्य करतात त्यांना कधी ही पाठीशी घालू नये असे हि यावेळी श्री जाधव यांनी सांगितले .

कर्नाटकातील भाजपा सरकार हे या घटनेला गांभिर्याने घेत नसल्याने या वेळी या सरकारचाही निषेध करण्यात आला कोणत्याही सरकारने समाजकंटकांना प्रोत्साहित न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हि यावेळी करण्यात आली .

ads

यावेळी जि प सदस्य बिभीषण आवटे, बाजार समितीचे संचालक देवानंद ढेरे, सामाजिक कार्यकर्ते तेजस ढेरे, सतीश अण्णा निंबाळकर यांनीही निषेध व्यक्त केला. तर या कार्यक्रमाचे सुरुवातीस श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माझे सरपंच दिगंबरराव गाडे, रघुनाथ ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड स्वराज्याचे आराध्य दैवत असून संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहे. म्हणून संपूर्ण गावाने स्वयंप्रेरणेने स्वतःहून गाव कडकडीत बंद केला होता.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE